Breaking

संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात, गंभीर जखमी


सांगली : सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अचानक चक्कर आल्यामुळे ते सायकलवरुन खाली पडल्याची माहिती आहे.


सांगली शहरातील गणपती पेठ येथे असणाऱ्या गणपती मंदिरात संभाजी भिडे नित्यनियमाने सायकलवरूनच दर्शनासाठी जात असतात. आजही नेहमीप्रमाणे मंदिरात जात असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने संभाजी भिडे अचानक सायकलवरुन जमिनीवर पडले. या अपघातात त्यांना कमरेखाली खुब्याला मार लागला असून या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


संभाजी भिडे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढावून घेतला आहे. संभाजी भिडे हे पुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. पण संघातील काही जणांशी वाद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा