Breaking

एसटीचा ब्रेक फेल झाल्‍याने पुण्यात भीषण अपघात, सात वाहनांना धडक


पुणे : पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर एसटीचा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एसटी बसने पाच ते सात वाहनांना मागून धडक दिली. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत.


सातारा आगाराची विनावाहक विना थांबा एसटी (एमएच ०६ एस ८४६७) गुरूवारी एसटीचा ब्रेक फेल झाल्‍याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून शंकर महाराज उड्डाणपुलावर अपघात झाला. या अपघातात चार ते पाच दुचाकीस्‍वारांना एसटीने उडवले. तसेच कारलाही धडक दिली. या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आणि चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी ससून रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या वाहनांशी अपघात टाळण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी चालकाने गाडी धडकवण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


मंत्रिमंडळ निर्णय : राज्य मंत्रिमंडळाचे तब्बल १० महत्वपूर्ण निर्णय


बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर मध्ये 696 जागांसाठी मेगा भरती, आजच अर्ज करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा