Breaking

शिवसेनेचे एकनाथ ढोले यांचा आम आदमी पक्षात प्रवेश


पुणे : शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ ढोले यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. ढोले हे गेली ३२ वर्षांपासून शिवसेनेचे सक्रीय पदाधिकारी होते.


आज आम आदमी पार्टी च्या पुणे शहर कार्यालयात राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते डॉ.अभिजित मोरे, पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, पुणे शहर निवडणूक प्रचार प्रशासन समितीचे सुदर्शन जगदाळे, विकास सुपणार, पियूष हिंगणे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

ढोले हे शिवसेनेमध्ये गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१७ साली शिवसेनेकडून पुणे मनपा निवडणूक लढवली आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा