Breaking

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विविध मागण्यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदननंदुरबार : आज दि.28 एप्रिल 2022 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांना निवेदन देण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शहादा तालुका कमिटीच्या वतीने खालील मागण्यांबाबत शिष्टमंडळामार्फत निवेदन सादर करण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात हनुमान चालींसाच्या मुद्द्यावरून भाजप राजकारण खेळत आहे.जातीय धर्म, भाषेचा गैरवापर करून अशांतता निर्माण करीत आहे. शहादा शहरात राम नवमीच्या नावाने दंगली पेटविणाऱ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांना हाताशी धरून आर.एस.एस हिंदू मुस्लिमच्या सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जय्यत तयारी करीत होते. त्याला पोलिस अधिकारी यांनी परवानगी नाकारल्यामुळे शहरात शांतता राहिली. 


शिक्षक संवर्गातील 200 बिंदू नामावली रद्द करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षची मागणी

त्यावेळी भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी गृहमंत्री यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन दिले की कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांची बदली करा अशी मागणी केली. भाजप व आर.एस.एस यांचा वरील घटनेबद्दल तिव्र निषेध करीत आहोत. पोटाची खडगी भरण्यासाठी किरकोळ फळ विक्री करणाऱ्यांच्या लाऱ्या अतिक्रमणच्या नावाने नगरपालिका त्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करीत आहे. त्याबद्दल पण आमची मुख्य मागणी आहे की त्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय त्यांना त्या जागेवरून हटवू नये.अशा मागण्या घेऊन प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


निवेदनावर माकपचे जिल्हा सदस्य कॉ.उत्तम पवार, तालुका सेक्रेटरी कॉ.सुनील गायकवाड, तसेच कॉ.कृष्णा ठाकरे, कॉ.खंडू सामुद्रे, कॉ.महारू पवार, कॉ.नथ्थू साळवे, रमाकांत बच्छाव, प्रताप ठाकरे, संतोष गायकवाड, राजाराम ठाकरे, दिनेश गुलाले, माधवराव आगळे, गणेश बोरदेकर, फरीद खान पठाण, रवींद्र ठाकरे, जगदीश वाडीले, संदिप पानपाटील इ.कार्यकर्ते उपस्थित होते.


आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत 310 पदांसाठी भरती, 5 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख


डिप्लोमा / ITI / पदवीधरांना संधी ! ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 3614 पदांसाठी मेगा भरती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा