Breaking


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवरनवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पडणार होती. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं असतानाच ऐनवेळ कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर निवडणुकांचे अधिकार राज्यानं विशेष कायदा पारित करत स्वतःकडे घेतले आणि त्यानंतर राज्यातल्या 18 पालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यालाच आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. यासाठी 13 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने 25 एप्रिल रोजी सुनावणी होणार असं जाहीर केलं होतं. मात्र हि सुनावणी आता पुन्हा 4 मे रोजी होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे.


दरम्यान, राज्यातील जवळपास 18 महापालिकांची मुदत संपली असून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय राजवट ठेवणे घटनाबाह्य मानले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा