Breaking

किरीट सोमय्या यांच्या जखमेबाबत वैद्यकीय अहवाल आला समोरमुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यांना खार पोलिस ठाण्यात भेटायला गेले असता यांच्यावर शनिवारी शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता, या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल आता समोर आला आहे.


राणा दाम्पत्यांच्या अटकेनंतर सोमय्या यांनी राणांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. यावेळी त्यांच्या हनुवटी जवळून रक्त येत होतं. त्यावेळी सोमय्यांना जखम झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाण्याऐवजी त्याच ठिकाणी गाडीत ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. या जखमेची मोठी चर्चाही झाली. सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर भाभा रुग्णालयात किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अखेर रुग्णालयाचा अहवाल आला आहे. 


या अहवालात किरीट सोमय्यांना कोणतीही मोठी जखम नाही असा रुग्णालयाचा अहवाल आता पुढे आला आहे. किरीट सोमय्या यांना ०.१ सेंटीमीटरची जखम असल्याचे आढळून आले. सूज, रक्तस्त्रावही नव्हता, असे अहवालात नमूद आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या जखमेवर शंका उपस्थित करत त्यांनी टोमॅटो सॉस लावला असावा, असेही राऊत म्हणाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा