Breaking

शिरूर : किसान सभेच्या दोन गाव समितीच्या नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न


शिरूर : राज्यातील विविध जिल्ह्यातील गावात किसान सभेच्या वतीने, किसान सभेच्या गाव समित्यांचे अधिवेशन घेऊन गाव समिती स्थापन करण्यात येत आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून किसान सभा शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, भूमीहीन कुटुंबे यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढत आहे. नुकतेच, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील, वडगाव रासाई व नागरगाव येथे किसान सभेची गाव समिती स्थापण करून या समितीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी गावातून छोटेखानी मिरवणूक ही काढण्यात आली होती. यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे उपस्थित होते. तसेच या गावांतील लोकप्रतिनिधी ही या कार्यक्रमाला उपस्थित होते.


या दोन्ही गाव समित्यांनी पुढील काळात गावपातळीवर किसान सभेच्या माध्यमातून कसे काम करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन किसान सभेचे पदाधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन किसान सभा, शिरूर तालुका समितीचे दत्तात्रय बर्डे, बापू धारवाड, सोमनाथ धारवाड, संतोष कांबळे, संदीप भांगरे, आंनद भांगरे व गुलाब धुळे यांनी केले होते.


कॉम्रेड बारक्या मांगात यांना हजारो लोकांनी दिला अखेरचा भावपूर्ण निरोप


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका सुरूच, सलग दहाव्यांदा वाढ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा