Breaking


नवनीत राणा यांच्या गंभीर आरोपानंतर संजय पांडे यांनी शेअर केला व्हिडिओ, राणा दाम्पत्याचा खोटारडेपणा उघड ?मुंबई : नवनीत राणा यांना तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली असून त्यांना दलित असल्यावरून बोलले जाते, त्यांना पिण्याचे पाणी दिला जात नाही अशा प्रकारचे खळबळजनक आरोप खासदार नवनीत राणांकडून करण्यात आले होते. त्या संदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. या आरोपानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात छळ सुरु असल्याच्या आरोप केला होता. त्यात मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला, असे गंभीर आरोप केले होते.


धोनीच्या पत्नीची 10 महिन्यांनंतर पोस्ट, ट्वीट करत सरकारला विचारला जाबअंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यांना ग्रॅच्युईटी चा लाभ देण्याचे निर्देश, सिटू संघटनेच्या प्रयत्नांना यश - डॉ.डि.एल. कराड


यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ जारी केला आहे. 


या व्हिडिओमध्ये पती-पत्नी दोघेही आरामात चहा-पान घेताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे राणा दाम्पत्याचा खोटारडेपणा उघड झाल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून म्हटले जात आहे.


Sarkari Naukri : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी 3 दिवस शिल्लक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा