Breaking

काय सांगता ! व्हाट्स ॲप आता वापरकर्त्यांना पैसेही देणार


मुंबई : व्हाट्साॲप मेसेंजर सातत्याने आपल्या ऍप मध्ये वेगवेगळे अपडेट आणत असते, काही दिवसांपुर्वी व्हाट्साॲपने पेमेंटची (whatsapp payments) सुविधा आणली. आता व्हाट्सपॲप युजर्सना कॅशबॅकही देणार आहे.


वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून व्हाट्सtॲप कॅशबॅक या फीचरची चाचणी करत होती. आता Google Pay आणि PhonePe सारख्या पेमेंट अॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी WhatsApp लवकरच पेमेंटवर कॅशबॅक योजना सुरू करू शकते. युजर्सनी व्हाट्साॲपवरील पेमेंटच्या (whatsapp payments) पर्यायाचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी कंपनीकडून कॅशबॅक (cashback ) सारख्या सुविधा आणल्या जात आहेत.


कृषी मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 50,000 रूपये पगाराची नोकरी


वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारतातील 100 दशलक्ष वापरकर्त्यांना पेमेंट सेवा प्रदान करण्यासाठी व्हॉट्सअॅपला मंजुरी मिळाल्यानंतर ही कॅशबॅक योजना भारतीय वापरकर्त्यांसाठी जारी केली जात आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp मे अखेरपर्यंत कॅशबॅक ऑफर लाँच करू शकते. यामध्ये यूजर्सना WhatsApp पेमेंट सेवेद्वारे फंड ट्रान्सफर केल्यास 33 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप यूपीआय सेवा वापरून निधी हस्तांतरित करावा लागेल.


असा मिळवा कॅशबॅक

व्हाट्सदॲप ओपन केल्यावर 'मोअर ऑप्शन'वर जावे. त्यानंतर पेमेंटवर क्लिक करा, त्यानंतर सेंड न्यू पेमेंटवर क्लिक करावे. ज्यांना पैसे पाठवायचे आहे, अशा कॉन्टॅक्टवर क्लिक करा. जर तो नंबर व्हाट्समॲपवर पेमेंटसाठी रजिस्टर आहे, तर त्याच्या नावासमोर एक गिफ्ट आयकॉन दिसेल. त्यानंतर अमाउंट टाका, नेक्टवर टॅप करावे, सेंड पेमेंटवर टॅप करा, आणि आपला युपीआय पीन टाका.


पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती


केंद्रीय माहिती आयोगात नोकरीची संधी, 60 हजार रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा