Breaking

व्वा रे रक्तपिपासू व्यापारी मोदी सरकार - काँग्रेस नेत्यांची कडवी टिका


मुंबई : सध्या देशभरात पेट्रोल डिझेल चे दर सलग अकराव्या दिवशी वाढले आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी भाजपच्या केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. देशभरात विविध ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. तर महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर कडवी टिका केली आहे.


पटोले यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टिका केली आहे. ट्विट मध्ये पटोले यांनी म्हटले आहे की, "रशियाकडून बाजारदरापेक्षा ३५ डॉलरच्या डिस्काऊंटने स्वस्त पेट्रोल डिझेल खरेदी करायचे आणि देशवासियांना आठ रुपये महागाने विकायचे! व्वा रे रक्तपिपासू व्यापारी मोदी सरकार!!"

पुढे पुढे लिहितात, "एक वर्षात डिझेलचा भाव २५ रूपयांनी भडकला. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी ८० पैशांच्या वाढीसह आठवड्याभरात इंधनात ८ रुपयांची दरवाढ ! पाकिटमार मोदी सरकार!!", अशी कडवी टिका केली आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा