Breaking

... तर भाजप नेते किरीट सोमय्या यांची हत्या झाली असती, या नेत्याने केले गंभीर आरोपमुंबई : राज्यात सध्या भोंगे, हनुमान चालीसा या विषयांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. या मुद्यावरून दररोज राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. राणा दांपत्याच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या त्यांना भेटायला गेले असता शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.


खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईत जोरदार वाद झाला होता. या घटनेने मोठे तणावाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर राणा दांपत्यांना खार पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलीस स्थानकात भेटण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. सोमय्यांना झालेल्या दुखापतीवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शंका उपस्थित केली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यावरून गंभीर आरोप केला आहे.


भाजप नेते किरीट सोमय्या हे या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळं सोमय्या यांनाच नष्ट करावं अशा प्रकारचा कट या सरकारचा आहे. किरीट सोमय्या यांना झेड सिक्युरिटी नसती तर त्यांची हत्या झाली असती, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे. तसेच, सांताक्रुझ पोलीस स्थानकात दाखल झालेला बोगस एफआयआर रद्द करावा. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांची चौकशी करण्यात यावी, असंही दरेकर म्हणाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा