Breaking

भोंग्याच्या वादावर अभिनेता सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक झाले आहे, त्यामुळे राज्यासह देशभरात राजकारण तापले आहे. नमाज आणि हनुमान चालीसाच्या वादाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या या मुद्द्याने धार्मिक असमानता निर्माण झालेली दिसते आहे. भोंग्याच्या वादावर आता अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे.


चाहते घायाळ, कतरिना कैफच्या बिकिनी फोटोंवर प्रियंका चोप्रा चे फायर इमोजी


देशभरात सुरू असलेल्या भोंग्याच्या वादावर राजकीय नेत्यांपासून अनेक लोकांच्या प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहे. आता अभिनेता सोनू सूदने आपलं मत मांडलं आहे. सोनू सुद म्हणाला, धर्म, जात यातून बाहेर पडलो तरच देशाचा विकास होईल. देशातील जनतेनं एकत्र येणं महत्वाचं आहे. जी ताकद हनुमान चालीसा मध्ये आहे तीच ताकद नमाजमध्येही आहे. जर आपण याच गोष्टीत अडकून राहिलो तर लोकांच्या समस्या कधीही संपणार नाही. राजकारण्यांनी खरं तर लोकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यात लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया सोनू सूदने दिली आहे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे होणार निवड !


दरम्यान, राज ठाकरे यांनी म्हटले आहे कि, मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचा आमचा निर्धार कायम आहे. मनसेच्या या भुमिकेमुळे राज्यभरात पोलिसांनी सुमारे 250 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.


बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा