मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. केतकी चितळे हीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
केतकीच्या आक्षपार्ह पोस्टमुळे राज्यभरात विविध पक्षाच्या नेत्याकडून संताप व्यक्त केला जात असून केतकीवर कारवाईची मागणी केली जात आहे. केतकीच्या विरोधात आतापर्यंत नऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेऊन आज कोर्टात हजर करण्यात आलं, त्यावेळी केतकी चितळेने स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. तिच्या वतीनं कुणीही वकील कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी नेमण्यात आलेला नव्हता. कोर्टातील युक्तिवादानंतर केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आली आहे.
यावर शरद पवार म्हणाले ''मला त्या प्रकरणाबद्दल माहीत नाही. मला व्यक्तीही माहित नाही आणि तुम्ही काय सांगताय हे देखील माहित नाही. नक्की काय बोलल्या आहेत हे माहिती झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य नाही.''
दरम्यान, खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं विकृती, सर्वपक्षीयांकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध करण्यात येत आहे. केतकीच्या पोस्टवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही, म्हणत एक पत्रक ट्विट करत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
सरकारी भरती : नागपूर येथील मॉयल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा