Breaking

संतापजनक : आंतरजातीय प्रेम विवाह केल्याने आईवडिलांची मुलीला जनावरांप्रमाणे मारहाण


अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात एक संतापजनक घडली आहे. मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्याने आईवडिलांनी मुलीला चक्क जनावरांप्रमाणे मारहाण केली आहे. इतकेच नाही तर तिला नवर्या्च्या घरातून अक्षरश: फरफटत आणले.


मोर्शी तालुक्यातल्या अंबाडा येथील 22 वर्षीय तरुण आणि 19 वर्षीय तरुणीचे प्रेमीयुगुलाने २८ एप्रिल रोजी मंदिरात जाऊन आंतरजातीय विवाह केला. या लग्नाला मुलीच्या आईवडिलांसह नातेवाईकांचा विरोध होता. मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे चिडलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी थेट तिचे घर गाठले आणि मुलीला चक्क घरातून फरफटत बाहेर आणत जबर मारहाण केली. मुलीच्या सासरच्या मंडळींनी मध्यस्थी करत असता दोन्ही कुटुंबांत हाणामारी झाली. मुलगा हा माळी समाजाचा तर मुलगी ही मराठा समाजाची असल्याची माहिती समोर येत आहे. हि घटना ४ मे रोजी घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

 

दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी चक्क मुलीला उचलून नेल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मुलीची आई-वडिलांच्या ताब्यातून सुटका केली आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप नवऱ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.


आशा व गटप्रवर्तक फेडरेशन राज्य अधिवेशन संपन्न, नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर


महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 1 लाख रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी करण्याची संधी, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा