Breaking


भाजप आणि महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचा फूटबॉल केला - आपचा आरोप


पिंपरी चिंचवड : भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) ने ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) फूटबॉल केला आहे, असा आरोप आम आदमी पार्टी (Aam admi party) चे पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) चे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केला आहे.


बेंद्रे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दोघे ओबीसी आरक्षणासंदर्भात गंभीर नव्हते आणि फक्त एकमेकांवर चिखल फेक करत होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश हा नाकारता येणार नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे ही आम आदमी पार्टीची मागणी पहिल्यापासून राहिली आहे आणि या पुढे ही राहील. 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Corporation Election) निवडणूकीसंदर्भात आम आदमी पार्टी तयार आहे आणि सर्व जागा लढवविणार आहे, असेही बेंद्रे म्हणाले.

तसेच आप महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत असून लोकांना अरविंद केजरीवाल यांचे शिक्षण, आरोग्यावर आधारित दिल्ली मॉडेल मनात भरले आहे आणि संपूर्ण पिंपरी चिंचवडकर याची मागणी करत आहे. लोकांच्या मनातच आप असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आप चांगली कामगिरी करेल आणि जनतेचे खरे नगरसेवक पालिकेत रुजू होतील अशी आम्हाला खात्री आहे, असेही बेंद्रे म्हणाले.

- क्रांतिकुमार कडुलकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा