Breaking


बार्शीत कामगार व महाराष्ट्र दिन साजरा


बार्शी : दिनांक 1 मे 2022 रोजी आयटक (AITUC) कामगार केंद्राच्या वतीने जागतिक कामगार दिन (International workers Day) व महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) संयुक्तपणे साजरा करण्यात आला. यावेळी कॉम्रेड कार्ल मार्क्स (Karl Marx) व महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंचावर प्रा. डॉ. अशोक कदम, नागजी सोनवणे, कॉ. लहू आगलावे, गंगावणे ताई उपस्थित होते.


महाराष्ट्र दिनावर प्रा. डॉ. अशोक कदम म्हणाले "छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या विचारातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. देश स्वतंत्र होण्याअगोदर असणारी राजघराणी त्यावर प्रांतरचना होती, परंतु भाषिक राज्याची निर्मिती व्हावी हा विचार पुढे येत गेला, निपाणी, कारवार, बेळगाव, मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी डाव्या विचारांचे नेते डॉ. आंबेडकर, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, एसएम जोशी, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, दत्तोबा गव्हाणकर, प्र. के. अत्रे आदींनी कष्ट घेतले, मोरारजीभाई देसाई, स का पाटील हे संयुक्त महाराष्ट्र विरोधी होते, यशवंतराव चव्हाण यांनी देखील महाराष्ट्रापेक्षा नेहरू प्रिय अशी भूमिका घेतली होती. हुतात्म्यांच्या रक्तातुन महाराष्ट्र निर्माण झाला,  भांडवलदार विरुद्ध कामगार शेतकरी असा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे."


कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद म्हणाले "केंद्र सरकार 4 लेबर कोड आणून कामगार कायदे मोडीत आहे, भांडवलदारांना साम्राज्य निर्माण करून देण्यासाठी हे सर्व होत आहे, कोरोना नंतर वाढती महागाई, बेरोजगारी, धर्माचे राजकारण, ग्रामपंचायत, बांधकाम, हॉस्पिटल, घरेलू  कामगारांचे, विद्यार्थांचे प्रश्न तीव्र झाले आहेत. पुढील लढाई साठी कामगारांनी सज्ज व्हावे."

इंटरची चे नागजी सोनवणे म्हणाले "बार्शी टेक्सटाईल मिल कोरोनाच्या नावाने केंद्र सरकार बंद करत आहे. खासगीकरणाचा डाव आखला जात आहे कामगारांना उद्ध्वस्त केले जात आहे.आम्ही लढत राहू."


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड शौकत शेख तर आभार रशिद इनामदार यांनी मानले. कॉ. धनाजी पवार, कॉ. भारत भोसले, आनंद गुरव, प्रा.अशोक वाघमारे, बोकेफोडे ताई आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा