Breaking

ब्रेकिंग : अभिनेत्रीची शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, संतापाची लाट


मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय दिवसेंदिवस दूषित होत आहे. एकीकडे हनुमान चालीसा आणि अजाण वरून राजकीय वातावरण तापले असतानाच अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हीच्या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली आहे. सध्या महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू असून त्याला धार्मिक रंग देण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप पुरोगामी विचारवंत, लेखक, साहित्य करत आहेत.


तर वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिने फेसबुक पोस्टद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress party President MP Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट (offensive post) केला आहे. अॅड. नितीन भावे नामक व्यक्तीची ही पोस्ट असून ती तिनं आपल्या वॉलवर पोस्ट केली आहे.


या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका करण्यात आली आहे. त्यामुळे या पोस्टवरून संतापाची भावना नागरिकांच्या मनात येऊ लागली आहे. दरम्यान, केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादग्रस्त पोस्टवर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. तर शेकडो लोकांनी पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे केतकीची फेसबूक पोस्ट ?

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा