Breaking


आयुक्त भाऊ आम्ही काय खाऊ ! का उपाशी मरू ? फेरीवाल्यांचा आक्रोश


पिंपरी चिंचवड : नॅशनल हॉकर फेडरेशन,कष्टकरी संघर्ष  महासंघातर्फे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून कायद्याची अंमलबजावणी करावी, सध्या सुरू असलेली आठ ही प्रभागातील कारवाई थांबवण्यात यावी व कायदेशीरपणे सर्वेक्षण व हॉकर्स झोनची निर्मिती करावी या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर आज पथारी, हातगाडी, टपरीधारकांचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.


यावेळी प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, मधुकर वाघ, किरण साडेकर, समाधान जावळे, कमल लष्करे, शोभा दोरवे, बिलाल तांबोळी, ओम प्रकाश मोरया, राजेश माने, संभाजी वाघमारे, सय्यद अली, बालाजी लोखंडे, यासिन शेख, राजाभाऊ हाके, वसंत भोसले, राजू बोराडे, नितीन सुरवसे, राजू खंडागळे, विजय लोखंडे, महादेव कोरे, पोपट करे, आदी सह पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, निगडी, दापोडी, डांगे चौक, सांगवी, पिंपळे गुरव, भोसरी, चिखली, मोरेवस्ती, थरमॅक्स चौक, निगडी भक्ती शक्ती चौक अशा विविध परिसरातील विक्रेते उपस्थित होते.


यावेळी नको स्मार्ट सिटी ! हवी फक्त रोजीरोटी ! नको अर्बन स्ट्रीट ! आम्हाला हवे व्यवसायाचे स्ट्रीट ! बेकायदेशीर कारवाई चा धिक्कार असो ! व्यवसाय आमच्या हक्काचा ! आयुक्त भाऊ आम्ही काय खाऊ ? अशा घोषणा देत फेरीवाल्यांनी आपल्या मागण्यांचे प्रदर्शन केले.

अनिल बारवकर म्हणाले की, पथारी, हातगाडी धारक स्वतःचा रोजगार निर्माण करतो या रोजगाराला पूरक वातावरण तयार करून देणे. महानगरपालिकेचे कर्तव्य आहे, आम्ही आमच्या जीवनाची लढाई लढत असताना आम्हाला समर्थन देणे सोडून कारवाई मोठ्या प्रमाणात करून कायद्याचा भंग केला जात आहे.


नखाते म्हणाले की, स्मार्ट सिटी चा बोजवारा उडाला आहे त्याच नावाने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून या कारवाईने प्रश्न सुटणार नाही तर फेरीवाल्यांचे योग्य नियोजन सर्वेक्षण व हॉकर्स  झोन अंमलबजावणीतून प्रश्न सुटणार आहे. अशी  भूमिका आयुक्तांनी घेणे गरजेचे आहे अन्यथा आधीच महागाई, त्यात बेरोजगारी वाढलेली आहे. त्यातच स्वयंरोजगार हिरावल्यास शहरांमध्ये उपासमारीने हाहाकार होऊ शकतो. आयुक्तांनी पुरस्कारा कडे लक्ष देण्यापेक्षा गोरगरीब विक्रेत्यावर कडे लक्ष द्यावे. जेणेकरून स्वयंरोजगार निर्माण होईल. स्वच्छ भारत अभियान मध्ये फेरीवाल्यांनी मोठे योगदान दिले स्वच्छ आणि टापटीप व्यवसायाचे सादरीकरण केले यामुळे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये फेरीवाल्यांचे सुद्धा योगदान आहे. हि कारवाई न थांबल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल.

- क्रांतिकुमार कडुलकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा