Breaking

माकपच्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहत साजरा


पुणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist party Of India) च्या वतीने सुदवडी, ता. वडगाव मावळ येथे महाराष्ट्र दिन व आतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शेतकरी कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


या कार्यक्रमासाठी माकप (CPIM) चे पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन सद्या परिस्थितीवर भाष्य केले. दराडे म्हणाले, केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे ज्या कायद्यामुळे कामगारचे जीवन उध्वस्त होणार आहे. 


आता पर्यंत शेतकरी आत्महत्या करीत होते येथून पुढे या केंद्रसरकारच्या कायद्यांमुळे कामगार आत्महत्या करतील. सर्व सामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. यावर बोलण्या ऐवजी काही लोक हनुमान चालीसा भोग्या यावर बोलून तरुणाच्या डोक्यात विष पेरण्याचे काम करीत आहेत. या पासून आपण सावधान राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

या वेळी अपर्णा दराडे, बाळासाहेब शिंदे, दौलत शिंगटे, पावसू करे यांनी कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमचे नियोजन अशोक उजगारे, चंद्रकांत जाधव, गुलाब पाटील, वृंदवनी चाटे, नताशा दराडे, नामदेव सूर्यवशी, सुप्रिया शिंगटे, महादेव सुरवसे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा