Breaking


संभाजीराजे यांना तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याच्या निषेधार्थ शहरात बंदतुळजापूर : माजी खासदार संभाजीराजे हे सोमवारी (9 मे) रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला. 


महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या घराण्याचं विशेष नातं राहिलं आहे. मात्र 9 मे रोजी सायंकाळी संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन करण्यात आले. त्यांना नवे नियम सांगून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवण्यात आले. या घटनेमुळे सकल मराठा समाजाकडून आज 12 मे रोजी तुळजापूर शहर बंद ठेवून मंदिर प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.


छत्रपती घराण्यातील वारसदारांना संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंदिर संस्थानमधील अधिकारी, व्यवस्थापक यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा