Breaking

पॉलिट ब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे यांच्या मार्गदर्शनाने माकपच्या जिल्हा अभ्यास शिबिराचा समारोप


नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड जिल्हा अभ्यास शिबीराचा आज माकप पॉलिट ब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे यांच्या मार्गदर्शनाने समारोप झाला.  दि.१२ मे रोजी दुपारी १२.०० वाजता संविधान अकॅडमीच्या अशोका बँक्वेट हॉलमध्ये शिबीराची सुरूवात झाली आहे. माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे यांनी शिबिराचे उदघाटन केले होते तर राज्य सचिव प्रा.डॉ.कॉ.उदय नारकर यांनी दि.१२ मे च्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले होते.


जिल्हा अभ्यास शिबिरात निवडक शंभर महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश होता. आज पॉलिट ब्युरो सदस्य कॉ.डॉ.अशोक ढवळे यांचा नांदेड जिल्हा पक्ष कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी मार्गदर्शन केले आणि प्रतिनिधीनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. 


अभ्यास शिबिरात काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गुरु्बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथून उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेले प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले, संविधान अकॅडमीचे संचालक प्रा.डॉ. गंगाधरराव सोनकांबळे, प्रा.डॉ.सविता सोनकांबळे, प्रा.डॉ.मारोती तेगमपुरे, सायन्स कॉलेज चे उपप्राचार्य प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे तसेच डॉ. हेमंत कार्ले आदींचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. 

शिबीर यशस्वी करण्यासाठी माकप जिल्हा कमिटीचे सचिव कॉ.शंकर सिडाम, कॉ.अर्जुन आडे, कॉ.विनोद गोविंदवार, कॉ.किशोर पवार, कॉ.उज्ज्वला पडलवार, कॉ. प्रल्हाद चव्हाण, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.शिवाजी गायकवाड, कॉ.शैलीया आडे, कॉ.जनार्दन काळे, कॉ.मंजूश्री कबाडे आदी जिल्हा कमिटीचे नेतृत्व प्रयत्नशील होते तर शहर कमिटीचे सभासद कॉ. कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.मीना आरसे, कॉ.लता गायकवाड आदींनी स्थानिक जबाबदाऱ्या सांभाळल्या.


दोन दिवशीय चाललेल्या अभ्यास शिबिरात पुढील दुसऱ्या टप्यातील नेतृत्व तयार करणे हा उद्देश मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा असून त्यासाठीच या अभ्यास शिबीरासाठी माकपची सर्वोच्च कमिटी असलेल्या पॉलिट ब्युरोचे सदस्य कॉ. डॉ.अशोक ढवळे हे नांदेड येथे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. जोशपूर्ण आणि क्रांतिकारी घोषणा देत शिबिराचा समारोप करण्यात आला.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा