Breaking

घरकुल वसाहतीत सदोष पाणीपट्टी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा - क्षेत्रीय जनसंवाद सभेत तक्रारींचा पाढा


पिंपरी चिंचवड
 : घरकुल वसाहत चिखली येथे मनपाने नवीन पाण्याचे मीटर बसवले मात्र चुकीची पाणी बिले आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अशोक मगर यांनी यांनी 'फ' प्रभाग अधिकारी उल्हास जगताप याचेकडे केली आहे.

यावेळी निवेदन देताना अशोक मगर यांनी सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी घरकुल मधील 140 सोसायट्यांमध्ये जुने मीटर काढून नवीन मीटर बसवले‌. ते मीटर हवेने फिरतात, आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, याबद्दल वारंवार निवेदन देऊन गेले चार महिने आम्ही सदोष मीटर बदला आणि नियमित पाणी पुरवठा करा, अशी मागणी करत आहोत. प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, असेही मगर म्हणाले.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा