Breaking


'दिघी ते राळेगण सिध्दी' धूम्रपान निषेध जनजागृती सायकल रॅली संपन्न !


दिघी : १ मे महाराष्ट्र दिना औचित्त्य साधत 'दिघी ते राळेगण सिध्दी' (Dighi to Ralegan Siddhi) धूम्रपान विरोधी जनजागृती सायकल रॅलीचे माॅविक सायकल क्लब च्या वतीने या आयोजन करण्यात आले होते.


आजच्या काळात उच्च शिक्षित तसेच आय.टी. (IT) क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण तरुणीनींची धूम्रपान करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक असून सुध्दा तरुण मुले मुली व्यसनाधिन होत आहे. परिणामी हृदयविकार, छाती दुखणे, ठोके कमी होणे, रक्त वाहिन्या बंद होणे यांसारखे धोक्याचे आजार होऊ शकतात.

या व्यसनांना विरोध म्हणून सायकल पटू दत्ता घुले यांनी मानवी हडाचां सापळा पोषाक परिधान करुन ठिक ठिकाणी धूम्रपान करु नका .., तरुण तारुण्यात शरिराचा सापळा होऊ देऊ नका, हे जीवन पुन्हा नाही, आयुष्य खुप सुंदर आहे, आरोग्य संभाळा, मस्त रहा, निरोगी जीवन जगा आदी संदेश देत जनजागृती करण्यात आली.

या रॅलीची सुरुवात दिघीतून पहाटे 3 वाजता करण्यात आली तर शेवट राळेगण सिध्दी मध्ये तरुणानांचे प्रेरणास्थान जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Aana Hajare) यांच्या उपस्थीत तसेच व्यसन विरोधी जनजागृती पत्रक देऊन रॅली संपन्न करण्यात आली. अण्णा हजारे यांनी या उपक्रमाचे व सायकल पटूंचे विषेश कौतुक केले.
 
या वेळी रॅली मध्ये सायकल पटू मयूर पिंगळे, सतिश मस्के, चेतन भुजबळ, सुनिल पाटोळे, प्रतिक झेले सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा