Breaking

वाढदिवस निमित्ताने गरजू महिलांना किराणा किटचे वाटप


पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, सदस्य, महाराष्ट्र महावितरण समिती आणि भाजप पिंपरी चिंचवड शहर सचिव मधुकर बच्चे यांनी काळेवाडी, चिंचवड येथील विधवा, परितक्त्या, निराधार महिलांना किराणा किटचे वाटप करून स्वतःचा वाढदिवस साजरा केला.


काकडे पार्क चिंचवडगाव येथील निवासस्थानी त्यांच्या सुविद्य पत्नी रोहिणी बच्चे आणि मुलासमवेत सर्व महिलांचे चहापान देऊन स्वागत केले. 

यावेळी 45 महिलांना किराणा किट वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ शिंदे हे उपस्थित होते.

यावेळी मधुकर म्हणाले की, या गोरगरिब महिलांना अक्षयतृतीयेच्या शुभ दिनी एक घास सुखाचा देताना मन भरून येत आहे. त्यांच्या आयुष्यात समृद्धीची पहाट यावी अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा