Breaking

एकनाथ पवार यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड !


भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्याकडून अभिनंदन !


पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी सत्तारुढ पक्षेने एकनाथ पवार यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यांनी तसे नियुक्तीपत्र दिले आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, सह निवडणूक प्रभारी संतोष कलाटे, पुणे भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.

भाजपाचा अभ्यासू आणि प्रभावी वक्ता अशी एकनाथ पवार यांची ओळख आहे. महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांमधून पवार यांना सत्तारुढ पक्षनेतेपदी संधी देण्यात आली होती. राज्य आणि केंद्रातील दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असलेले पवार भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा