Breaking

प्राधिकरणतुन वर्ग केलेल्या मिळकतीना किचकट प्रक्रियेतून वगळा - हौसिंग सोसायटी फेडरेशनची मनपाकडे मागणी


चिखली - मोशी - पिंपरी चिंचवड शहर हौसिंग सोसायटी फेडरेशनची मनपाकडे मागणी


पिंपरी चिंचवड : प्राधिकरण बरखास्त केल्यानंतर शासन निर्णयानुसार प्राधिकारणातील  सर्व विकसित मालमत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वर्ग करण्यात आलेल्या आहेत. परंतु प्राधिकरणाचे पूर्वीचे मालमत्ता हस्तांतरण करतानाचे नियम, हस्तांतरण शुल्क, प्रशासकीय जे नियम होते, ते सर्व नियम कायम ठेवल्यामुळे मालमत्ता धारकांना किचकट प्रक्रियेतून  जावे लागत आहे. किचकट प्रक्रिया वगळून ही संपूर्ण प्रक्रिया पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी सुलभ करावी, अशी मागणी संजीवन सांगळे यांनी केली आहे.

प्राधिकरण येथील सोसायटीधारक, फ्लॅटधारक, बंगलोधारक आणि फेडरेशन प्रतिनिधी यांच्या बैठकीत चिखली-मोशी  पिंपरी चिंचड शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष- संजीवन सांगळे म्हणाले की, सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या मालमत्ता हस्तांतरण करताना जी  प्रक्रिया, हस्तांतरण शुल्क या बाबत जे नियम आहेत. तेच नियम सद्या प्राधिकारणाकडील मालमत्ता पिंपरी चिंचवड मनपाकडे वर्ग केलेल्या आहेत, त्यांना असावेत. जे नियम पिंपरी चिंचवड मनपातील मालमत्ताना लागू आहेत तेच नियम आता प्राधिकारणातुन पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडे वर्ग केलेल्या मालमत्ताना लागू करावेत व तेच नियम असावेत, यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरवले.

प्राधिकारणातील  मालमत्ता धारकांच्या विविध मागण्यांसाठी  पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरले आहे. जर प्राधिकारणातील मालमत्ता हस्तांतरण करताना पूर्वीचे किचकट नियम व पूर्वीप्रमाणेच हातांतरण शुल्क भरावे लागत असतील. तर मग या सर्व मालमत्ता पिंपरी चिंचवड मनपाकडे वर्ग करून काय फायदा झाला? याचा काय उपयोग आहे? असे संतप्त सवाल मिटिंगमध्ये नागरिकांनी उपस्थित केले.

याबाबत आमदार महेश लांडगे यांना स्वतंत्र निवेदन देणार असल्याची माहिती संजीवन सांगळे यांनी दिली आहे. तसेच शासनस्तरावर देखील याचा पाठपुरावा करण्याचे ठरले आहे.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा