Breaking


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या ‘या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक, काय आहे प्रकरण वाचा !


मुंबई : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (NSDL) ने सिलव्हर ज्युबिली (Silver Jubliee) निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी सीतारमण यांचे कौतूक करत आहेत.


मुंबईत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेडचा (NSDL) कार्यक्रम शनिवारी पार पडला, या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देखील उपस्थित होत्या. त्यावेळी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंदुरू या कार्यक्रमादरम्यान भाषण देत चंदुरु यांचा घसा सुकल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांकडे पाणी मागितले. त्यावेळी कर्मचारी पाणी घेऊन येईपर्यंत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या आसनावरून उठून ग्लास आणि पाण्याची बाटली घेऊन पोहोचल्या. सीतारमण यांनी स्वत: उठून पाणी दिल्यामुळे प्रेक्षकांनी टाळ्याही वाजवल्या. पाणी घेतल्यानंतर चंदुरु सीतारमण यांना धन्यवाद म्हणाल्या.


एलॉन मस्क यांनी केलेल्या ट्विटमुळे जगभरात खळबळकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निर्मला सीतारमण यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. निर्मला सीतारामन यांनी स्वत: उठून पाणी दिल्याने त्यांनी लोकांची मने जिंकली आहे, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा