Breaking

मदर्स डे निमित्त गुगलने लॉन्च केले खास डूडल, एकदा बघाच !

मुंबई : गुगल हा अनेक वेगवेगळ्या दिवसांनिमित्त आपले डूडल जारी करत असतो, गूगलने आज आईपण जपणार्या  महिलांसाठी खास डूडल समर्पित केलं आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. आज मदर्स डे (Mother's Day) या दिवसाचं औचित्य साधत गूगनेही (Google) खास गूगल डूडल (Google Doodle) लॉन्च केले आहे. Google ने आपल्या डूडलद्वारे आई आणि मुलाचं जिव्हाळ्याचं नातं अधोरेखित करताना एक छुपा संदेश देखील आहे. त्यामुळे मातांच्या समर्पणाचा दिवस अधिक खास बनवला आहे. Google ने मदर्स डे 2022 रोजी चार स्लाइड्ससह एक विशेष Gif डूडल जारी केले आहे. त्यामध्ये आई आपल्या मुलाची काळजी कशी घेते हे देखील दाखवले आहे.


GIF मध्ये बदलणार्याद आजच्या गूगल डूडलमध्ये आई मूलाला शिक्षणाचे, पाणी जपून वापरण्याचे आणि वृक्षलागवडीचे संदेश देत असल्याचे पहायला मिळाले आहे. यामधून आई-मुलाचे गोड नातं पहायला मिळत आहे


1908 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी एक कायदा बनवला, ज्या अंतर्गत दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा