Breaking

असानी चक्रीवादळामुळे अनेक विमानांचे उड्डाणे रद्द तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसमुळे जनजीवन विस्कळीत


मुंबई : बंगालच्या खाडीत आलेले असानी चक्रीवादळ (Asani Cyclone) आता रौद्र रुपात बदलले आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी विमानसेवा प्रभावीत झाली आहे.


असानी चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडीशा, बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या प्रदेशातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या हवामानामुळे अनेक ठिकाणी विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. चेन्नई विमानतळावरुनही हैदराबाद, विशाखापट्टण आणि जयपूर, मुंबईकडे जाणाऱ्या १० विमानांचे उड्डाण रद्द झाले आहे.


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम-मध्य आणि त्यालाच लागून असलेल्या दक्षिण बंगालच्या खाडीत समुद्रामध्ये वाऱ्याची जोरदार हालचाल सुरु आहे. त्यामुळे या परिसरात १३ मे पर्यंत पर्यटनाच्या सर्व सेवा स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मच्छिमारांना देखील काही काळ समुद्रात न जाण्याचा सुचना दिल्या आहेत.


दरम्यान, हवामान विभागाने चक्रीवादळामुळे तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगना या राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा