Breaking

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप तातडीने सुरू करा - आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाची राज्य सरकारकडे मागणी

संग्रहित छायाचित्र

घोडेगाव : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना (tribal research students) फेलोशिप तातडीने सुरू करा (Immediately start fellowships), अशी आग्रही मागणी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (Tribal Rights National Forum) च्या वतीने राज्य सरकारकडे (State Government) मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसे निवेदन आंबेगाव तहसील कार्यालय यांच्याकडे देण्यात आले आहे.


आदिवासी संशोधक विद्यार्थी दि.2 मे 2022 पासून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे येथे दुसऱ्यांदा धरणे आंदोलनास बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, पुणे च्या आंबेगाव तालुका समितीने पाठींबा जाहीर दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या तत्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.


निवेदन देतेवेळी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे राजू घोडे, अविनाश गवारी, शंकर काठे, संदीप काठे, प्रा.स्नेहल साबळे हे उपस्थित होते.

• निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे :

१. अनुसूचित जमातीच्या (ST) पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांना तत्काळ अधिछात्रवृत्ती देण्यात यावी.

२. महाराष्ट्रातील सर्व कृषी व अकृषी विद्यापीठामध्ये अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेवर पीएच.डी प्रवेशाकरिता जातवैधता प्रमाणपत्र अनिर्वाय करण्यात यावे.


३. रखडलेली एस.टी विशेष भरती तात्काळ सुरू करावी.

वरील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास, आदिवासी अधिकार राष्टीय मंचाच्या वतीने व्यापक स्तरावर आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा