Breaking

नांदुरा येथे रेल्वे गेट उड्डाण पूलाच्या कामाचे 2015 मध्ये उद्घाटन, काम सुरू करण्याची किसान सभेची मागणी


बुलढाणा : नांदुरा जि.बुलढाणा येथे रेल्वे गेट उड्डाण पूलाचे काम तातडीने सुरू करा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.


नांदुरा जि बुलढाणा येथे रेल्वे गेट उड्डाण पूलाचे भुमिपूजन १ नोव्हेंबर २o१५ रोजी नितीन गडकरी यांचे हस्ते झाले होते. पण या उड्डाण पूलाचे काम अद्यापही सुरू झाले नाही. रेल्वे गेट वर उड्डाण पूलाचे नसल्याने वाहतुकची मोठी समस्या निर्माण होते. 


शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. किसान सभेने गेल्या दोन वर्षापासून सतत पाठपुरावा केला अखेर किसान सभेच्या वतीने दि ५ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. 

धरणे आंदोलनात किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. दादा रायपूरे, जिल्हा सचिव कॉ.अनिल गायकवाड जिल्हा अध्यक्ष कॉ.जितेंद्र चोपडे, किसान सभा नेते विजय पोहनकर, कॉ.रामेश्वर डॉ.विप्लव का, कविश्वर काळे, एसएफआय चे जिल्हा अध्यक्ष सागर पताळे, शेख अकबर, सागर पहुरकर, फकीरा वानखडे, संतोष पाटील, शेख मेहबुब, महादेव भiमद्र, श्रीराम भेड्या, किसन भेडया, बदा अही आदींसह धरणे आंदोलनास बसले आहेत.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा