Breaking

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सुरक्षेत वाढ, केंद्राने दिली “ही” सुरक्षापुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पडळकरांना एक्स (X) दर्जाची सुरक्षा दिली आहे.


काही दिवसांपुर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोलापूरमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पडळकर यांना सुरक्षा देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांकडून राज्य सरकारकडे करण्यात येत होती, मात्र, राज्य सरकारकडून पडळकरांना सुरक्षा देण्यात आली नाही. अखेर केंद्र सरकारने पडळकर यांना सीआयएसएफची एक्स दर्जाची सुरक्षा दिली आहे.


आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात अनेकदा कडवट शब्दांत टीका करत असतात. सोलापूरमध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यामुळे भाजप नेत्यांच्या विनंतीवरून आता केंद्र सरकारनेच पडळकर यांना सुरक्षा दिली आहे. त्यामुळे पडळकर यांना आता केंद्राची एक्स (X) सुरक्षा असणार आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, विरोधकांवरही साधला निशाना


राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत भरती, 40,000 रूपये पगाराच्या नोकरीची संधी ! 6 मे अंतिम तारीख


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा