Breaking

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची पुन्हा बेमुदत धरणे


पुणे : आदिवासी पीएचडी (Phd) संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सुरू करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा संशोधक विद्यार्थ्यांनी पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे समोर बेमुदत धरणे आंदोलन छेडले आहे.


ज्याप्रमाणे बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांकडून विद्यार्थ्यांना Phd संशोधन करण्यासाठी फेलोशिप मिळते. त्याच प्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (trti) यांच्याकडून पीएचडी संशोधन करण्यासाठी फेलोशिप मिळावी, या मागणीसाठी मार्च महिन्यात दहा दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले होते. आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी आश्वासन देऊनही अद्याप त्या मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याने आज 2 मे 2022 पासून पुन्हा विद्यार्थी बेमुदत धरणे आंदोलनाला बसत आहेत.या बेमुदत धरणे आंदोलनात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती देण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व कृषी व अकृषी विद्यापीठांमध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर पीएच.डी प्रवेशा करिता जातवैधता प्रमाणपत्र (validity) अनिवार्य करण्यात यावी आणि दि 6 जुलै 2017 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने ज्यांची जातवैधता प्रमाणपत्र अवैध झाले आहेत त्यांना सेवेतून कमी करून मूळ आदिवासींना सेवेमध्ये सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्या आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समितीने केल्या आहेत.


Nokari : भारतीय टपाल विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, 7 मे शेवटची तारीख


श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा