Breaking

DYFI च्या वतीने 'जातीय सलोखा - हम सब एक है' कार्यक्रम


मुंबई : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या मुंबई जिल्हा समितीने 'जातीय सलोखा - हम सब एक है' या विषयावर कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


तसेच राज ठाकरे कोण आहेत आणि ते आपल्या राज्यात आणि देशात जातीय तेढ पसरवण्याचा प्रयत्न करत असताना मीडिया त्यांच्याबद्दल इतके का बोलत आहे, आम्ही महाराष्ट्र पोलिसांना विनंती करतो की जातीय दंगली पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंना अटक करा, अशीही मागणी करण्यात येत आहे.

DYFI ही एक संघटना आहे जी नेहमी सामान्य लोकांसोबत त्यांच्या मुलभूत हक्कांसाठी आणि 'जातीय सलोखा- हम सब एक है' या संदेशासह काम करते. DYFI ने म्हटले आहे की, 'आम्हाला आपल्या देशात सर्व लोक एकत्र हवे आहेत, जाती पंथ आणि दिसण्याच्या आधारावर कोणताही फरक केला जाऊ नये. 

कारण स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे काही लोक आता द्वेष पसरवण्याचा आणि आमची एकात्मता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्ही DYFI म्हणून अशा समस्यांसाठी नेहमीच एकजुटीच्या पाठीशी उभे राहू आणि आम्ही सर्वांना आवाहन करणार आहोत की आपण सर्वजण आपल्या देशात एकोपा, एकता राखण्यासाठी आहोत." या कार्यक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा