Breaking

जुन्नर : आदिवासी युवकाने वाढदिवस निमित्ताने केले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर मजूरांना छत्रीचे वाटप


जुन्नर : खटकाळे (ता.जुन्नर) येथील सुशिक्षित युवक सचिन गणपत मोरे यांने वाढदिवस निमित्ताने समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. सचिनने स्वतः च्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खटकाळे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजूरांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी छत्रीचे वाटप केले आहे.


शाळेच्या विद्यार्थ्यांना वही, पुस्तक वाटपच्या वेळी काशिनाथ मोडक, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोरे, ग्रामसेवक किसन साबळे, शिपाई योगेश मोडक, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती थोरात  व मोरे मॅडम, गणपत मोरे, मनीषा भवारी आदींसह उपस्थित होते ‌‌.

तर वृक्ष संगोपन मजुरांना छत्री वाटपावेळी उपसरपंच भरत मोडक, तसेच मजुर जिजाबाई भवारी, सविता मुंढे, देवकाबाई मोडक विमल मोडक उपस्थित होते.

तसेच खटकाळे येथे गावात रोजगार हमी ची बैठक लावून लोकांना रोजगार हमीची संपूर्ण माहिती दिली व गावात कसा रोजगार उपलब्ध होईल याची माहिती दिली व ग्रामपंचायत मध्ये किती कामे मंजूर आहेत. याची माहिती देऊन कोणाला कोणत्या कामावर याछी माहिती घेण्यात आली. तसेच 25 जणांचे काम मागणी चे अर्ज भरून घेण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा