Breaking

जुन्नर : दोन बालविवाह प्रशासनाने रोखले


जुन्नर : वडज, ता. जुन्नर येथे आज मंगळवार ता.१० रोजी होणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.


याबाबत चाईल्ड लाईनकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर जुन्नर पोलीसांच्या मदतीने तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी ए. के. साळुंखे, तालुका स्तरीय बालविवाह प्रतिबंधक अधिकारी एन. डी. कोल्हे विवाहस्थळी पोचले. विवाह स्थळी एकाच मंडपात दोन मुलींचे बाल विवाह होत असल्याचे दिसून आले यावेळी बालविवाहासाठी सुमारे ५०० हुन अधिक लोक उपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

हे बाल विवाह होण्यापूर्वीच विवाह थांबवण्यात आले व जुन्नर पोलीस स्टेशन येथे दोनही मुला-मुलीच्या पालकांकडून मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्याखेरीज त्यांची विवाह करणार नाही असा जबाब लिहून घेण्यात आला, या कार्यवाहीसाठी जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक पवार, तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी ए. के. साळुंखे, बाल विवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत वडज एन डी कोल्हे, पोलीस पाटील वंदना शेळके व इतर पोलीस कर्मचारी यांच्या एकत्रीत प्रयत्नाने मुलींचे बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा