Breaking

महिला शक्तीची ताकद दाखवू - कविता आल्हाट


राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षांची निवड जाहीर


पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षांची निवड शुक्रवारी (दि. ६) जाहीर करण्यात आली. यामध्ये  पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी रमा नितीन ओव्हाळ, चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी संगीता लहू कोकणे आणि भोसरी विधानसभा अध्यक्षपदी ज्योती सागर तापकीर यांची आज निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मोर्चे बांधणी सुरू केली असून या नियुक्त्या राष्ट्रवादीची शहरात ताकद वाढवणार आहे असे यावेळी महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी म्हटले आहे.

एक हाती सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीची  पाऊले - आल्हाट

आगामी महानगरपालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात महिला संघटन मजबूत केले जाणार आहे असे कविता आल्हाट यांनी सांगितले.

महिला शक्तीची ताकद दाखवू

महिला संघटन आणि एकजुटीची ताकद आम्ही आगामी महापालिका निवडणुकीमध्ये दाखवून देऊ असा विश्वास नवनियुक्त महिला विधानसभा  अध्यक्षांनी यावेळी बोलून दाखविला. प्रत्येक विधानसभा कार्यक्षेत्रात महिलांच्या संघटन शक्तीच्या जोरावर आम्ही राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ असेही नवनियुक्त महिला विधानसभा अध्यक्ष नियुक्तीनंतर म्हणाल्या.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा