Breaking

मोठी बातमी : आमदार जिग्नेश मेवानींसह १२ जणांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा, दंडही ठोठावला


मुंबई : गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना महेसाणा कोर्टाने मोठा झटका दिला आहे. मेवाणी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांना एका जुन्या प्रकरणात कोर्टाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


उना येथील दलित मारहाणीचे प्रकरणसमोर आल्यानंतर १२ जुलै २०१७ रोजी मेहसाणाजवळील बनासकांठा येथे ‘आझाडू कूच’ नावाने आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी आमदार मेवानींसह राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल आणि सुबोध परमार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात एकूण १२ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. यावर महेसाणा कोर्टाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.


भोंग्याच्या वादावर अभिनेता सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...


इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार यांच्या न्यायालयाने या संदर्भात निकाल देताना "रॅली काढणे हा गुन्हा नसून परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे", असे निरीक्षण नोंदवले.


मेवाणी यांच्या सहकाऱ्यांपैकी एक कौशिक परमार याने मेवाणी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय दलित अधिकार मंच या संघटनेच्या बॅनरखाली रॅलीसाठी मेहसाणाच्या कार्यकारी दंडाधिकार्यांतकडे परवानगी मागितली होती आणि त्याला सुरुवातीला परवानगी देण्यात आली होती. नंतर परवानगी रद्द करण्यात आली, तरीही आयोजकांनी रॅली काढली होती.


बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


सध्या जिग्नेश मेवाणी जामिनावर बाहेर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी मेवाणीला गुजरातमधून अटक केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा