Breaking


भ्रष्टाचार मुक्त भारताच्या राज्य उपाध्यक्ष पदी महेशकुमार जगताप यांची निवड


पुणे : दिवसेंदिवस वाढत चाललेला अन्याय, अत्याचार व भष्ट्राचारावर विरोधी प्रसार करून लढा उभा करून पिडीतांना न्याय मिळवुन देण्यासाठी राष्ट्रीय जनकल्याण सेवा संस्था महाराष्ट्र बीड च्या महेशकुमार जगताप यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे नियुक्ती पत्राद्वारे झाली आहे.


राष्ट्रीय जनकल्याण सेवा संस्था महाराष्ट्र यांनी महेशकुमार जगताप यांनी गेल्या २० वर्षा पासुन पत्रकारीतेच्या कार्यकाळात आपल्या निर्भिड लेखनिच्या माध्यमातुन अन्याय, अत्याचार व भ्रष्ट्राचार प्रकरणी सतत वृत्त प्रकाशीत करून व व्यक्तीश: शासन दरबारी तक्रारी /लढा देऊन अनेक पिडीत ग्रस्थाना न्याय मिळवुन दिला आहे.बीड जिल्यातील राशनचा काळाबाजार, पिक अनुदान, जि.प बीडचा संगणक अनाधिकृत सॉफ्टवेअर घोटाळा,पिक अनुदान सह अनेक प्रकणात तालुका तहसिल ते मंत्रालय मुंबई पर्यत तक्रारी / आवाज उठवल्याने महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषद मध्ये तात्कालीन आमदार मंगेश सांगळे, सुरेश नवले, अमरसिंह पंडीत सह ईतर आमदारांनी तारांकित प्रश्न / लक्षवेधी उपस्थीत केल्याने चौकशी अंती राज्य शासनाने दोषी विरूद्ध राज्य शासनाने काही प्रकरणी दंडात्मक / निलंबनाची कठोर कारवाई केली होती. तर शेतकरी पिक नुकसान अनुदान तात्काळ शेतक्याच्या खात्यावर रक्कम वर्ग करून न्याय मिळवुन दिला होता.


राष्ट्रीय जनकल्याण सेवा संस्था महाराष्ट्र राज्य (भारत) ने वरिल प्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे नियुक्ती पत्र राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष धनंजय तळेकर, महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप पाठक व महिला कार्याध्यक्ष लक्ष्मी भालेराव यांनी कळवत या पुढील कार्यकाळात अन्याय, अत्याचार व भ्रष्ट्राचार विरोधी प्रसार करून पिडीतांना न्याय मिळवुन देण्याची अपेक्षा व्यक्त करत शुभेंच्छा दिल्या आहेत.

पदाला न्याय मिळवुन देणार - महेशकुमार जगताप

यापुर्वी प्रमानेच पुढील काळातही राज्यातील दैनदिन वाढते महिलावरील अन्याय व अत्याचार या प्रकरणी गांभिर्याने दखल घेऊन शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवुन न्याय मिळवुन देणार व भ्रष्टारावर अंकुश निर्माण करण्यासाठी राज्यभरात भ्रष्ट्राचार विरोधी प्रसार करू. कोणाच्या काही व्यक्तीश:तक्रारी असतील तर लेखी / पुराव्यासह संस्थेला कळवले तर नक्कीच न्याय मिळवुन दिला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहु महाराज, क्रांतीज्योती महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा समतेच्या संदेश व शिका संघटीत व्हा व संघर्ष करा हा संदेश कृतीत आणुन सर्वांच्या प्रश्नांना न्याय मिळवुन देणाय असेही जगताप यांनी बोलतांना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा