मुंबई : नुकताच आलेल्या 'केजीएफ चॅप्टर 2' या साऊथ चित्रपटाने देशभरात धुमाकूळ घातला, असतानाच, 'केजीएफ चॅप्टर 2' मधील प्रसिध्द अभिनेते मोहन जुनेजा यांच्या निधनाचे वृत्त समोर येत आहे.
मोहन जुनेजा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बेंगलोर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होतं. आज सकाळी 7 च्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. मोहन यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
ಕನ್ನಡದ ಖ್ಯಾತ ಹಾಸ್ಯ ನಟರಾದ ಮೋಹನ್ ಜುನೇಜಾ ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ.
— Hombale Films (@hombalefilms) May 7, 2022
ನಮ್ಮ ಕೆಜಿಎಫ್ ಚಿತ್ರ ತಂಡದ ಜತೆಗಿನ ಅವರ ಅವಿನಾಭಾವ ಸಂಬಂಧ ಮರೆಯಲಾರೆವು.
Our heartfelt Condolences to actor Mohan Juneja's family, friends & well-wishers. He was one of the best-known faces in Kannada films & our KGF family. pic.twitter.com/xDDHanWuY0
यशची मुख्य भूमिका असलेल्या 'केजीएफ 1' आणि 'केजीएफ 2' या दोन्ही चित्रपटांमध्ये मोहन जुनेजा यांनी भूमिका साकारल्या होत्या. 'वॉल पोस्टर' चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात सुरूवात केली होती, चित्रपटांसोबतच त्यांनी मालिकांमध्येही काम केलं होतं. त्यांनी तब्बल 100 हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
महागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 'इतक्या' वाढल्या
जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा