Breaking

नाशिक : किसान सभेचे जिल्हा अधिवेशन 15 मे रोजी नांदगाव येथे होणार


नाशिक : महाराष्ट्र राज्य किसान सभा नाशिक जिल्हा अधिवेशन 15 मे 2022 रोजी नांदगाव येथे गुप्ता लान्स येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह ते गुप्ता लान्स पर्यन्त रॅली काढण्यात येणार आहे. अधिवेशन साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड हिरालाल परदेशी(धुळे) उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी भाकप किसान सभा राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले राहतील. 


अधिवेशनात शेती, शेतकरी प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन निश्चित्त करण्यासाठी विविध ठराव मांडण्यात येतील. मागील अधिवेशन नंतर आज पर्यँचे झालेल्या जिल्यातील आंदोलन चा आढावा जिल्हा सचिव देविदास भोपळे मांडतील. पुढील तीन वर्षासाठी नवीन पदाधिकारी निवड करण्यात येणार आहे. 


अधिवेशन स्थळाला दिवंगत नेते किसान सभेचे राज्य अध्यक्ष राहिलेले कॉम्रेड माधवराव गायकवाड नगर नाव देण्यात येणार आहे. तर किसान सभा नांदगाव तालुका माजी अध्यक्ष दिवंगत कॉम्रेड शंकर गंभीरे, व किसान सभा नेते दिवंगत फकिरा पवार प्रवेशद्वार नाव देण्यात येणार आहे. किसान सभा राज्य सरचिटणीस दिवंगत कॉम्रेड नामदेवराव गावडे यांचे नाव देण्यात आले आहे.

तसेच शिरपूर येथे 28, 29 मे 2022 रोजी राज्य किसान सभेचे राज्य अधिवेशन प्रतिनिधी निवड करण्यात येणार आहे. तरी अधिवेशनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन किसान सभा जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भास्करराव शिंदे, जिल्हा सचिव देविदास भोपळे, जिल्हा संघटक कॉम्रेड विजय दराडे, जिल्हा उपाध्यक्षा अड साधना गायकवाड,  ऍड दत्तात्रय गांगुर्डे, सुखदेव केदारे, नामदेव बोराडे, प्रकाश भावसार, एकनाथ दौंड, जगन माळी, मधुकर मुठाळं,  किरण डावखर, छभु पुरकर, लॅक्समन अहिर, निवृत्ती कसबे, अनिल जिरे, तानाजी बॅंडकुळे आदींनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा