Breaking

खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भोसरी येथे राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा


जश्ने ईद-ए-मिलन कार्यक्रमाचे आयोजन – अजित गव्हाणे


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने ईद-ए- मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे, भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील, माजी महापौर आझम पानसरे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील पक्षाचे सर्व माजी महापौर, नगरसेवक, नगरसेविका,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि. ११ मे २०२२ रोजी राजमाता जिजाऊ कॉलेज, लांडेवाडी, भोसरी या ठिकाणी सांयकाळी ६:०० वा.कार्यक्रमास सुरुवात होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

गव्हाणे म्हणाले, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौध्द धर्मातील - पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख धर्मगुरूंना सदर कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. सध्या केंद्रातील भाजपा सरकार हे राज्यातील ज्या पक्षाचे राजकिय अस्तित्व संपत आलेले आहे, अशा राजकीय पक्षाला पुढे करून महाराष्ट्र राज्यात जातीय तेढ  निर्माण करण्याचे काम चालू आहे. तसेच प्रक्षोभक भाषणे करून हिंदू-मुस्लिम यामधील दरी निर्माण करण्याचे काम करताना दिसत आहे. समाजात अशांतता निर्माण होऊन समाजामध्ये भीतीदायक वातावरण तयार करण्याचे काम भाजपाच्या वतीने चालू आहे. केंद्रातील भाजप सरकार अतिशय खालच्या स्तरावरचे राजकारण करून सत्तेचा दुरुपयोग ते स्वत:चे राजकिय स्वार्थ साधण्यासाठी काम करताना सर्व सामान्य जनतेला दिसत आहे.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील सुज्ञ जनता अशा चुकीच्या गोष्टीला कदापी खतपाणी घालणार नाही. जातीयवादी पक्ष व धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना जनता आगामी काळात त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. शरद पवार साहेबांनी त्यांच्या ५५ वर्षाच्या सामाजिक व राजकिय जीवनामध्ये काम करीत असताना आपल्या देशातील सर्वसामान्य नागरीक यांना केंद्रबिंदू मानून काम केलेले आहे. आपल्या देशात विविध जाती-धर्म, पंथांचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व प्रचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोविण्यासाठी “राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने -ईद-ए-मिलन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, जेष्ठ नेते संजोग वाघेरे पाटील, जेष्ठ नेत्या मंगला कदम, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, शमीमताई पठाण, भाऊसाहेब भोईर, विठ्ठल काटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, युवक अध्यख इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, पूर्णचंद्र् स्वाईन, इकलास सय्यद इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते. 

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा