Breaking

पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ३१ हजार फेलोशिप, यांनी केली घोषणा


मुंबई : गेल्या ५३ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर फेलोशिपमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू होते. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.


'महाज्योती' तर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप देण्यात येते. मात्र दिल्या जाणाऱ्या फेलोशिपमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते. आता पीएच.डी. (Ph.D) करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) ने मासिक फेलोशिप मध्ये घसघशीत वाढ केली आहे. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना या आधी 21,000 रुपये मासिक फेलोशिप मिळत होती, त्यात वाढ करुन आता 31,000 रुपये करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ पासून ३१ हजार रुपये फेलोशिप देण्याची घोषणा 'महाज्योती'चे अध्यक्ष आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व इतर मागासवर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली. 



सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, महाज्योती मे पासून फेलोशिप देणार होती. मात्र, विद्यार्थ्यांनी १ जानेवारी २०२२ पासून देण्याची मागणी केली होती आणि आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यावर महाज्योतीने जानेवारी फेलोशिप देण्याचा ठराव मंजूर केला होता. याचा एकूण ७५३ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा