Breaking

विद्यापीठातील वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याची सोय करा - एसएफआयचा आंदोलनाचा इशारा


नांदेड : येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील (Swami Ramanand Teerth Marathwada University) वस्तीगृहात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, मे महिना सुरू झालेला असताना सुद्धा विद्यापीठ प्रशासन वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया - एसएफआय (Student Federation Of India -SFI) विद्यार्थी संघटना आत्ता आक्रमक झाली आहे. 


यासाठी दि १२ मे रोजी कुलगुरू डाॅ. सर्जेराव शिंदे यांना एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटीच्या वतीने निवेदन देऊन मुलींच्या वस्तीगृहात तात्काळ आरोफिल्टर पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा एसएफआयच्या वतिने उद्या दि १३ मे रोजी सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन कुलगुरूच्या निवास्थाना समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आले.विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी लाखो रूपये खर्च केले जातात तर नेमका हा खर्च कुठे होतो हेच कळत नाही. विद्यापीठात राहणाऱ्यांना विद्यार्थ्यांना ज्या मूलभूत सविधा मिळायला पाहिजेत त्या तर पुरवल्या जात नाहीत. आरोग्याची सुविधा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, बांथरूमची स्वच्छता, दारांना कड्या नाहीत, कॅम्पंस परिसरातील रस्त्यावर लाईट नाही. अशा अनेक समस्या येथे आहेत. वारंवार मागणी करून देखील सुद्धा विद्यापीठ प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे यापुढे विद्यापीठात येणाऱ्या मंत्र्यांना एसएफआय काळे झेंडे दाखवणार

- काॅम्रेड पवन जगडमवार 
एसएफआय विद्यापीठ कमिटी नांदेड


विद्यापीठातील वस्तीगृहात मोठ्या संख्येने विद्यार्थीं राहत आहेत. पण विद्यार्थ्यांना अनेक मूलभूत सविधा देण्यापासून विद्यापीठ प्रशासन टाळा टाळा करीत आहे. निदान पिण्यासाठी पाणी तरी शुद्ध मिळावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. एसएफआय नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाना घेऊन विद्यापीठात आवाज उठवत असते. त्यांनी मागणी केल्यानंतरच विद्यापीठात मुलीच्या स्वच्छतागृहात सर्वत्र सॅनिटरी पॅडचे नविन मशिन बसवण्यात आले, पण त्या मशिन मध्ये पॅड उपलब्ध करायाला विद्यापीठ तयार नाही. मुलींच्या वस्तीगृहातील हाॅस्टेल क्रमांक एक या एका ठिकाणीच फक्त पाणी आरोफिल्टर मिळते त्यामुळे तिथे खुप गर्दी होते पाणी पण संपते तर बाकीच्या ठिकाणी मशिनच खराब झालेले आहेत. तर काही ठिकाणी फक्त पाणी थंड होते. मात्र ते फिल्टर होत नाही. याकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी अनेक ठिकाणी नविन आरोफिल्टर मशिन बसवण्यात आले.मात्र ते मशिन वेवस्थित पाणी फिल्टर करीत नाही. त्यामुळे दूषित पाणी पिऊन अनेक विद्यार्थी व विद्यार्थिंनी आजारी पडत आहेत.

कावीळ ,उलट्या पोटखी यासह अनेक आजार विद्यार्थ्यांना नेहमीच होत आहेत. वारंवार मागणी करून देखील विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने एसएफआयने थेट कुलगुरू निवासस्थाना समोर आत्ता आंदोलन करण्याचे ठरवले आहे. या निवेदनावर एसएफआयचे काॅम्रेड पवन जगडमवार, सचिन मरशिवने, हारबाळे, निकीता, मोरे प्रियंका, स्नेहल बेनगर यांच्या सह अनेक विद्यार्थिंनीच्या स्वाक्षऱ्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा