Breaking

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनास स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने दिला जाहीर पाठिंबा


पुणे : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना (tribal research students) फेलोशिप तातडीने सुरू करा (Immediately start fellowships), या प्रमुख मागणीसाठी आदिवासी संशोधक विद्यार्थी 2 मे 2022 पासून दुसऱ्यांदा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI - Tribal Research and Training Institute Pune ) येथे आंदोलनास बसले आहेत. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (Students Federation Of India - SFI ) ने या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे.


एसएफआय ने म्हटले आहे की, संशोधक विद्यार्थ्यांची सरकारने परवड चालवली आहे. सरकारने आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया तीव्र आंदोलन करेल.

तर राज्य सरकार जाणूनबुजून आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची चाललेली ही परवड कधी थांबणार हा सवाल आता केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा