Breaking


पुणे - मुंबई दुचाकी रॅली पोलिसांनी रोखली, बंदी हुकूम मोडून कामगार मुंबईत


पिंपरी चिंचवड : 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन निषेध दिन जाहीर केलेल्या पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीची हजारो कामगारांची मुंबईला निघालेली रॅली पिंपरी चिंचवड पोलिसांनी अडवली. पहाटे 4 वा पोलिसांचा मोठा फौजफाटा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे दाखल झाला होता.


पोलिसांनी यावेळी रॅलीत सामील झालेले रॅली निघताच पिंपरी पोलिसांनी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, कामगार नेते अनिल रोहम, वसंत पवार यांच्यासह शेकडो कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


केंद्रसरकारने एकतर्फी संमत केलेले चार कामगार कायदे रद्द करावेत, आणि पूर्वीचे कायदे अबाधित ठेवावेत या मागणीसाठी निषेध करणारी ही रॅली मुंबई येथे राजभवानावर निघाली होती. मात्र, पोलिसांनी सभेला परवानगी दिली होती. पिंपरी येथे सभा समाप्त झाल्यानंतर बंदी हुकूम मोडून सविनय कायदेभंग करत शेकडो कामगार दुचाकी रॅली सह मुंबईकडे रवाना झाले असल्याचे समजते.




सिटूच्या वतीने दडपशाहीचा निषेध 

पुणे - मुंबई दुचाकी रॅली पोलिसांनी रोखली, यांचा भिकू कामगार संघटनेने निषेध केला आहे. सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड म्हणाले, कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने केंद्र सरकारने केलेले कामगार विरोधी चार लेबर कोर्ट रद्द करावेत या मागणीसाठी मोटर सायकल रॅली आयोजित केली होती. परंतु यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलीस प्रशासनाची हे अत्यंत लोकशाहीविरोधी व कामगार विरोधी कृती आहे.

महा विकास आघाडी सरकार जर केंद्र सरकार प्रमाणेच कामगार विरोधी भूमिका घेणार असेल तर यापुढे आघाडी सरकारला सुद्धा तीव्र विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असेही कराड म्हणाले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा