Breaking


संस्कार प्रतिष्ठानचे सर्वच क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय : मृत्यूंजय माने


स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार वितरण संपन्न


पुणे : संस्कार प्रतिष्ठानचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. संस्कार प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून ते आज जवळपास १६ वर्षांच्या काळात प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप लोक जोडले गेले आहेत. डॉ. मोहन गायकवाड आणि त्यांचे कुटुंब, प्रतिष्ठानचे सर्व सभासद बंध भगिनी खूप चांगले काम करत असल्याचे गौरवोद्गार टाटा मोटर्सचे उपमहाव्यवस्थापक मृत्यूंजय माने यांनी काढले. ते संस्कार प्रतिष्ठानच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्ता आयोजित श्री. स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. 

चिंचवड येथे आयोजित या कार्यक्रमात जनसंपर्क अधिकारी आणि निवेदन बाबासाहेब मेमाणे, कामगार कल्याण केंद्राचे प्रमुख प्रदीप बोरसे, अभिनेत्री रुपाली पाथरे, अभिनेत्री आरोही हिवरकर, संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड आणि सचिव भरत शिंदे आणि संस्कार प्रतिष्ठानची संपूर्ण टीम उपस्थित होती.


डॉ.मोहन गायकवाड यांचं सर्व क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. नोकरी आणि कुटुंब संभाळून समाजकार्य करणं हे कोणाचेही काम नाही. पण मोहन गायकवाड यांनी ते करून दाखवलं. त्यांच्या कार्याला सलाम असही माने यांनी म्हटलं. 

यावेळी बाबासाहेब मेमाणे यांनी संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने सातारा,कोल्हापूर, कोकणातील पूरस्थितीच्या काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. तर मोहन गायकवाड यांनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणाऱ्या व्यापक कार्याची माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 पुरस्कारार्थींना संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने श्री.स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. 


श्री. स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारार्थी

भास्कर मारुती सिनारे (समाजरत्न)
खुशी सोमनाथ हासे (क्रीडारत्न)
भरत कृष्णराव गुंजाळ (कामगाररत्न)
डॉ.कृष्ण जगन्नाथ घोगरे (डॉक्टररत्न)
डॉ.पुंडलीक जयवंत बरकाले (डॉक्टररत्न)
डॉ.संजय कढणे (समाजरत्न)
डॉ. बाळासाहेब वाकचौरे (समाजरत्न)
सुरेख दयाराम क्षिरसागर (संस्काररत्न)
साक्षी कड(करोना योद्धा पुरस्कार)
सचिन पवार (डॉक्टररत्न)
आरोहि हिवरकर (कलारत्न)
विजयकुमार थिटे (कलारत्न)
सविता भांगर (आदर्श सरपंच पुरस्कार)
प्रिती चुडासमा (संस्काररत्न)
तेहसीन शेख (समाजरत्न)
राम भालेराव (समाजरत्न)
अनिल सोळुंके (उद्योगरत्न)
वैशाली मोहिती (उद्योगरत्न)
बाळासाहेब साळुंके (आदर्श कामगार पुरस्कार)
कांता राठोड (आदर्श कामगार पुरस्कार)

संस्था सभासद वार्षिक सन्मान
विरेंद्र केळकर (करोना योद्धा)
रेवती जरग (कोल्हापूर जिल्हा प्रमुख) असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा