Breaking

दिल्लीमध्ये मोफत वीज बंद केल्याचे वृत्तांकन खोडसाळपणाचे - आप


दिल्लीत २०० युनिट वीज मोफतच... वीज सबसिडी हवी की नको याचा पर्याय नागरिकांना उपलब्ध


पुणे : दिल्ली मध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने 200 युनिट वीज मोफत केली आहे हे सर्वश्रुत आहे.  पंजाब मध्ये सरकार स्थापने नंतर लगेचच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 300 युनिट वीज फ्री देण्यात येणार असल्याची घोषणा केली. या दोन राज्यांत अंशत: वीज ही फ्री मिळते तशी ती इतर राज्यां मध्ये का मिळू शकत नाही असा सवाल सामान्य नागरिक करू लागल्याने अन्य काही पक्षानी ही मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले. 

विजेबाबत असे वातावरण असताना अचानक काही वृत्त वाहिन्यांनी व वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या की दिल्ली येथील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने वीज बिलावरील सबसिडी काढून घेतली. या बातमीची सत्यता पडताळून पाहता कळले की अशा बातम्या धादांत खोट्या, विपर्यस्त व संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत, असे आप पुणे शहर मीडिया टीम च्या प्रमुख मंजुषा नयन यांनी म्हटले आहे.


नयन पुढे म्हणाल्या, वास्तवात दिल्ली सरकारने असा निर्णय घेतला की ज्यांना वीज बिलावरील सबसिडी नको आहे ते तसे सरकारला कळवु शकतात. ज्यांना वीज बिलात सबसिडी हवी आहे  त्यांना ती दिली जाईल.  त्यासाठी दिल्ली सरकारतर्फे एक सर्वेक्षण घेण्यात येवून किती वीज ग्राहकांना वीज बिल सबसिडी हवी आहे व किती ग्राहकाना ती नको आहे याची निश्चित माहिती गोळा केली जाईल. या सर्वेक्षणातून आलेल्या माहितीच्या आधारे 1 ऑक्टोबर 2022 पासून पुढील योजना आखली जाईल. या आशयाची माहिती दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक योजना लाँच करतेवेळी दिली होती.  

त्या बातमीचा संपूर्ण विपर्यास करून धादांत खोटी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दिली. तर काही वृत्त पत्रांनी चुकीची माहिती प्रकाशित केली. अशा पद्धतीचे वृत्तांकन हे खोडसाळपणाचे असून याबाबतीत सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी ही हे निवेदन जारी करण्यात येत असल्याचे नयन म्हणाल्या.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा