Breaking


व्हाट्सअप द्वारे पाठवा 2 GB पर्यंत फाईल-व्हिडिओ, पहा ते कसे !


नवी दिल्ली : व्हाट्सअप (Whatsapp) हे जनसामान्यांत लोकप्रिय असे इंस्टंट मेसेजिंग ॲप (Instant Masseginge App) आहे. व्हाट्सअप सातत्याने आपल्या फिचर्स मध्ये बदल करत आहे. नुकतीच व्हाट्सअपने पैसे ट्रान्स्फर आणि त्यावर बक्षीस देणारे फिचर्स अपडेट (Whatsapp Update) केले आहे. आता नव्या फिचर्स ने आपण 2 जीबी (GB) पर्यंत डाटा व्हाट्सअप माध्यमातून पाठवू शकतो.


तसेच, आता व्हाट्सअप ने आता गटामधील (ग्रुप चॅट) लोकांची संख्या 257 वरून तब्बल 512 केली आहे. ज्यांना ते 2 GB इतक्या आकाराच्या फाइल्स पाठवू शकतात आणि त्यांच्या संदेशांवर इमोजीसह प्रतिक्रिया देऊ शकतात. 

इमोजीसह वैशिष्ट्याव्यतिरिक्त, व्हाट्सअप ने वापरकर्त्यांना एकावेळी 2 GB आकाराच्या फाइल्स पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पूर्वीची मर्यादा 100 MB होती. हे एक मोठे अपग्रेड आहे. 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा