Breaking

शहीद दत्ता पाडाळे यांच्या पुतळ्याचे मनपाने केले तातडीने सुशोभीकरण - आम आदमी पार्टीच्या मागणीला यश
पिंपरी चिंचवड : आकुर्डी येथील शहीद दत्ता पाडाळे (Shaheed Datta Padale) यांच्या पुतळ्यास आम आदमी पार्टी (Aam admi party) च्या आंतरराष्ट्रीय कामगार दिना (International workers Day) निमित्त कार्यकर्त्यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.


या पुतळ्याची गेली काही वर्षे दुर्दशा झाली होती. त्या ठिकाणी दररोज स्वच्छता होत नव्हती. तसेच पुतळ्याची रंगगोटी आणि नियमित स्वच्छता करावी. 1979 मध्ये बजाज कामगारांच्या आंदोलनात गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या या शहीदाच्या पुतळ्याचे प्रशासनाने नियमानुसार सुशोभीकरण त्वरित करावे, अशी मागणी 28 मार्च 2022 रोजी आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी अ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे एका जनसंवाद सभेमध्ये करण्यात केली होती. महाराष्ट्र जनभूमीने सर्वप्रथम या बातमीला प्रसिद्धी देत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.


आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड मनपाने ही मागणी पूर्ण केली आहे. गेली दोन दशके औद्योगिक नगरीतील हा पुतळा धूळ खात होता.

चेतन बेंद्रे म्हणाले की, कामगार चळवळीत शहीद झालेल्या दत्ता पाडाळे यांना मानवंदना देताना खूप आनंद होणार आहे. शासकीय नियमानुसार सदर पुतळ्याचे सुशोभीकरण झाल्यामुळे आमच्या प्रयत्नाचे चीज झाले आहे. श्रमिकांच्या नगरीतील कामगार नेत्यांच्या पुतळ्याचे पावित्र्य जपण्यासाठी आपण सर्वांनी नेहमी जागरूक राहिले पाहिजे. आम्ही महापालिकेच्या प्रभाग अधिकारी आणि आयुक्त यांचे आभारी आहोत.


यावेळी चेतन गौतम बेंद्रे, राज चाकणे, एकनाथ पाठक, चंद्रमाणी जावळे, लप्रकाश हगवणे, सरोज कदम, अण्णा कुऱ्हाडे, गंगाधर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा